फैजपूर शहरात महिलेवर जबरजस्ती लैंगिक अत्याचार
फैजपूर, ता.यावल. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील एका ३० वर्षीय तरुण महिलेवर तरुणाने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती आजही की, पिडीत महिलेने फैजपूर पोलिसस्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास पिडीत महिला आपल्या घरात एकटी झोपलेली असताना शेख आरिफ शेख जाबीर, वय २६, वर्ष हा तरुण घरात आला आणि पीडितेला धमकावत जर कोणाला काही सांगितले आणि आवाज काढला तर मी सांगेल की, तुझे-माझे पूर्वीपासून लफडं होतं, अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, भेदरलेल्या पीडित महिलेने सदरचा झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितला असता फैजपूर पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात
येऊन शेख आरिफ शेख जाबीर यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोउ मोहन लोखंडे, यांचे सह चेतन महाजन, हर्षल चौधरी हे करीत आहेत.