भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

आमोदा येथे लिंपि रोगावर जनावरांना मोफत लसीकरण

फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। सध्या जनावरांना होत असलेला लंपी स्किन ह्या आजाराने परिसरात थैमान घातले आहे.ह्या रोगाचा संसर्ग थांबवा म्हणून गावातील पशुपालक यांच्या मागणी नुसार ग्रामसभेत ठराव संमत करून ग्रामपंचायत आमोदे व श्रीराम दूध उत्पादन संस्था यांच्या मार्फत आज दिनांक १०/०८/२०२२ रोजी मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात गावातील व गावाजवळील जनावरे जिथे बांधलेली असतात तिथे जाऊन लस देण्यात आली. गावातील जवळ जवळ ९५% जनावरांना लस देण्यात आली.यावेळी आमोदे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. या प्रसंगी पशु यावल तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बढे ,डॉ.इंगळे व तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण पूर्ण केले तसेच कार्यक्रम पसंगी ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाटील , सरपंच हसीना फकिरा तडवी ,सदस्य राजू पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, दूध उत्पादक संस्था चेअरमन राजेंद्र चौधरी ,व्हाईस चेअरमन गोलू लोखंडे, सदस्य व कर्मचारी , पोलीस पाटील तुषार चौधरी सर्व पशुपालक उपस्थित होते. या लसीकरणासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वाघूळदे,वसंत पाटील ,प्रसाद चौधरी ,गुणवंत पाटील , अल्लाउद्दीन तडवी ,मोनु बैरागी , सचिन चौधरी , खेमचंद लोखंडे या सर्वांचे सहकार्य लाभले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!