फैजपूर च्या पावन भूमीवर बाविसाव्या “युवारंग” महोत्सवाचे शानदार उद्घाटन
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठाच्या 22 व्या युवारंग तसेच धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असलेल्या युवा रंग 2022 चे उद्घाटन प्रसिद्ध सेने नाट्य कलावंत ओंकार भोजने यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभासाठी पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित असलेले मराठी सिने सृष्टीचे नामवंत विनोदी अभिनेते ओमकार भोजने यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की युवकांसाठी अभिनय आणि कलासृष्टीत पदार्पण करत असताना संघर्ष करण्याची तयारी आणि त्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व पटवून दिले आणि कला विश्वात वावरत असताना आपले व्यक्तिगत जीवन हे समाजाची संपत्ती असते म्हणून नितीमुल्यांच्या माध्यमातून तिचे संरक्षण करणे ही एका कलाकाराची जबाबदारी आहे असे सांगत समोर उपस्थित कलाकारांना आवाहन केले की कलाक्षेत्रात युवरांगतील सर्व कलावंतांचे स्वागत आहे भविष्यात तुम्हीही माझ्यापेक्षा मोठे कलाकार व्हा अशी शुभेच्छा दिल्या
कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात युवक महोत्सव म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाची सांगड घालणारा एक रंगीत महोत्सव या रंगीत महोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी आपल्या प्रतिभांना कलागुणांना जगासमोर सादर करावे आणि एक यशस्वी कलाकार म्हणून समाजात नावलौकिक मिळवावे हे असे सांगितले तसेच आयोजनाविषयी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर आणि विद्यापीठातील समितीच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले
स्वागत अध्यक्ष आमदार शिरषदादा मधुकरराव चौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, यांनीही आपल्या भाषणात युवारंग म्हणजे केवळ रंगीत कलांचा उत्सव नसून याच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि सामाजिक घटनांचा परामर्श मांडला गेला पाहिजे या सोबतच ऐतिहासिक घटनांची जान करून देण्यासाठी फैजपूर येथे भरलेल्या 1936 च्या राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाची आठवण करून देत सर्व हुतात्म्यांच्या कार्याची आठवण या निमित्ताने करून दिली आणि छुपे रुस्तम हे गाणं सादर करून उपस्थित सर्व युवक प्रेक्षकांची मन जिंकली.
प्रास्ताविक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी विद्यार्थी विकास अधिकारी कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांनी युवा रंगाची प्रस्तावना करत असताना सांगितले की तिन्ही जिल्ह्यातील लहान मोठ्या सर्वच महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोठा असा हा युवारंगा उत्सव आहे ज्याच्या माध्यमातून दरवर्षी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते म्हणूनच विद्यार्थी जीवनात युवकांसाठी लाखो रुपये खर्च करून विद्यापीठ अशा प्रकारचा कार्यक्रम राबवीत असते या कार्यक्रमाचा सर्व कलाकारांनी अतिशय आनंदाने,उत्साहाने आणि सामंजस्याने आस्वाद घ्यावा व आपल्या अंगी असलेल्या कलांचे प्रदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आपले भाषण संपवले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ.संतोष चव्हाण- सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग,जळगाव यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयीन जीवनात अशा प्रकारच्या महोत्सवांसाठी शासनातर्फे लागणारी योग्य ती मदत योग्य त्यावेळी करण्यात येईल असे आश्वासन देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कला विश्वात आणि इतर सामाजिक कामातही आपले वर्चस्व दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी सुरुवातीला समोर उपस्थित युवा जनसमुदायाला आवाहन केले की युवारंग 2022 हा अत्यंत मोठा उत्सव आहे,जवळपास दोन हजार कलावंत आणि इतर मान्यवर या प्रांगणात पाच दिवस उपस्थित असणार आहेत म्हणून अपणा सर्वांना सेवा देण्याचे पुण्य कर्म आमच्या हातून घडविण्याच्या मान विद्यापीठाने आम्हाला दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आणि महाविद्यालतीन प्रशासना ला शक्य असतील त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू अशी ग्वाही देत सर्व कलाकारांनी ही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, स्वागताध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी, प्रमुख पाहुणे सह संचालक डॉक्टर संतोष चव्हाण, प्रज्ञावंत डॉक्टर नंदकुमार बेंडाळे कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राजू दादा नन्नवरे, कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील रवींद्र पाटील, सुनील कुलकर्णी, समन्वयक डॉक्टर एस व्ही जाधव, सह समन्वयक डॉक्टर राकेश तळेले, युवा रंग महोत्सव सदस्य प्राध्यापक स्वप्नाली महाजन, अमोल पाटील, सुरेखा पालवे, नेहा जोशी, डॉक्टर सुनील पवार, डॉक्टर पी डी पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापक एकनाथ नेहते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन राजेंद्र राजपूत,डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले तर आभार डॉ. एस व्ही जाधव समन्वयक युवारंग 2022 यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील कुलकर्णी विद्यार्थी कल्याण विभाग संचालक यांनी केले तर कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी खानदेश हा कर्तुत्वाची खान आहे खानदेश कन्या बहिणाबाई या श्रद्धा तपस्या त्या मानाचे स्थान प्रतिष्ठा अशा सर्व गुण संपन्न कवयित्री होत्या. तसेच त्यांनी युवा रंगा बाबत माहिती दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा