फैजपूर परिसरात इको व्हॅन मधून अवैध गुटख्याची बिनधास्त पोहोच सेवा, आशीर्वाद कोणाचा?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यात फैजपुर शहरासह परिसरात विमल गुटख्याची इको व्हॅन गाडीतून अवैधरित्या बिनधास्त विक्री सुरू असल्याचे वृत्त ” मंडे टू मंडे न्युज ” ने प्रसारित केले, फैजपूर येथील गुटका विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली… आणि फोनाफोनी सुरू झाली, काय होणार? काही होणार नाही? पाहू , गुटखा विक्रेत्यांचा “जीव धोक्यात चिळी खोप्यात ” अशी परिस्थिती झाली. या अवैध गुटका विक्रेत्याला आशीर्वाद कोणाचा? कारवाई का होत नाही?
फैजपूर शहर व परिसरात फैजपूर येथील ” मNiष ” नामक व्यक्ती शेव चिवडा, बटाटा चिप्स आदींच्या सोबत इको व्हॅन मधून मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची पिंपरुड,आमोदा, बामनोदा, पडाळसे, भलोद हंबर्डी ,हिंगोणा आदी परिसरसतील गावांमध्ये पोहोच सेवा देऊन विक्री करीत आहे. प्रशासनाने आंधळे पणाची भूमिका घेतली आहे….! क्रमश: