हिंगोणा येथे आदर्श विवाह,भावाच्या मृत्यूनंतर विधवा वहिनीशी थाटला संसार
हिंगोणा ता. यावल, मंडे टू मंडे न्युज, इम्रान पिंजारी। असे म्हटले जाते लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते मात्र जुन्या रूढी परंपरा यांना फाटा देत यावल तालुक्यातील हिंगोणा येथे एक आदर्श समाज्यासमोर ठेवण्यात आला, पुनम वायकोळे असं या मुलीचं नाव आहे तर गिरीश वायकोळे असं नवरदेव मुलाचं नाव .
मोठ्या भावाच्या मृत्यू नंतर पोरकी झालेली वहिनी पूनम हिचा व लहान मुलीचा भविष्याचा विचार करून गिरीश आणि पुनम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच लग्न करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाला गिरीश व पूनम यांनी देखील मुलीच्या भविष्याचा विचार करून होकार दिला त्या नुसार दिनांक ३१ जानेवारी मंगळवार रोजी हिंगोणा गावात रीती रिवाज प्रमाणे समाजाच्या नातेवाईकांच्या व ग्रामस्थांच्या साक्षीने हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला
गिरीश हा उच्च शिक्षित तरुण असून जुन्या रीती रिवाज ला फाटा देत त्याने वहिनीला व मुलीला आधार दिला आहे . त्याच्या भावाचा मृत्यु ६ महीन्या पुर्वी झाला होता व त्याला ३ वर्षाची मुलगी होती . विधवा वहीनीशी लग्न केल्यामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे .