यावल तालुक्यात लाकडांचा अवैध साठा जप्त,अवैध लाकूड व्यवसायिकांमध्ये खळबळ
यावल,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। यावल तालुक्यातील कोरपावली रस्त्यावर १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा आडजात लाकडाचा एकाच ठिकाणी मोठा अवैध साठा आढळून आला, यावल पश्चिम वनक्षेत्रातील वाघझिरा तथा हरिपुरा वनपाल पथकाने यावर कारवाई केल्याने यावल -रावेर तालुक्यासह परिसरातील अवैध सागवानी व अवैध आडजात लाकूड व्यवसायिकां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.हा अवैध लाकूड साठा कोणाचा? या लाकूड साठयाशी काहींची नावे जोडली जात आहेत?
गुरुवार दि.१८जानेवारी २०२४ रोजी वनपाल वाघझीरा तथा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा वाघझिरा राउंड स्टाफ सह यावल तालुक्यातील दहिगाव येथे दहिगाव कोरपावली कच्च्या रस्त्यावर तपासणी केली असता अवैध इंजायली लाकूड साठा आढळून आला.जप्त मुद्देमाल इमारती नग ९३ घ.मी.१२.२१५,पंचरास जळाऊ थप्पी ११- घ.मी.११५.५१२ एकूण माल किंमत १३४०३१ रु. सदर गुन्ह्याबाब वनपाल हरीपुरा यांनी प्र.री.क्र.१/२०२४ दि.१८/१/२०२४ चा जारी केला असुन.सदरची कार्यवाही ही यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघझिरा व अतिरिक्त कार्यभार वनपाल हरीपुरा येथील विपुल. दि.पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे,सरला भोंगरे,अक्षय रोकडे,अश्रफ तडवी यांनी कारवाई केल्याने अवैध सागवानी व अवैध अर्जात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.