Video| भरदुपारी ज्वेलरी दुकानात शिवसेना अध्यक्ष्याच्या मानेवर पिस्तूल ठेऊन दागिने लंपास
Monday To Monday NewsNetwork।
यावल(प्रतिनिधी)। येथील कोर्ट रस्त्यावरील व गजबजलेल्या वस्तीत असलेल्या बाजीराव काशिदास कवडी वाले यांचे ज्वेलरी दुकानात आज बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानातून किती माल लंपास केला याबाबत अध्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही.
शिवसेनेचे शहर अध्यक्ष तथा ज्वेलरी दुकान चे संचालक जगदीश कवडीवाले हे दुपारी दुकानात असताना 20 ते 25 वयोगटातील चार तरुणांनी दुकानात प्रवेश करत सुरुवातीला बोटाकडे इशारा करत अंगठी बनवण्याचा इशारा केला. व लगेच कवडी वाले यांच्या मानेवर पिस्तोल ठेवत शोकेस फोडून त्यातील सोन्याचा माल लंपास केला ते दुकानाचे बाहेर गेल्यानंतर कवडी वाले यांनी आरडा..ओरड करताच दुचाकीवर चार जणांनी बसून रस्त्याने पोबारा केला . परिसरातील तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले यांनी यांचे पिस्तोल मधून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे काल सतोद रस्त्यावर दुपारी १ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकल स्वराच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकून त्याचे कडील ५५ हजार रुपयांची लूट चोरट्याने केली होती, गेल्या दोन दिवसापासून भर दुपारी होत असलेल्या या सतत च्या घटनांमुळे घबराट निर्माण झाली असून पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत पोलिसांचा धाक संपला असल्याची चर्चा आहे.