यावल तालुक्यात कर्ज मंजुर करुन देण्याच्या नावाखाली एक लाखात गंडवले
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील तरुणाला कर्ज मंजुर करुन देण्याच्या नावाखाली एक लाखात गंडवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणोद येथील आशिष युवराज तळेले ,वय २३, धंदा – खासगी नोकरी ह्या तरुणांच्या मोबाईलवर मोबाईल क्रं ९९१११०३९०५ व ९६६७८५२९५० धारक यांनी फोन करून तुम्हाला भारती अँक्सा लाईफ ईन्सुरन्स कंपनीची पॉलीसीवर सहा लाख कर्ज मिळवून देतो अशी थाप मारली. त्यासाठी तुम्हाला pre payment charges साठी १७ हजार ५१२ रुपये तसेच क्रेडीट चार्ज म्हणून २५ हजार ५०० रुपये, फुल अँन्ड फायनल सबमिशन पेमेंट म्हणून ३० हजार रुपये आणि लोण फायनल मंजूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा २८ हजार ४०० रुपये भरावे लागतील, त्यावेळेस तुमचे कर्ज मंजुर होईल असे सांगितले.
त्यामुळे आशिषने १० ते २२ ऑगस्टच्या दरम्यान, १ लाख १ हजार ४१२ रुपये पाठविले. परंतू कर्ज मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आशिषने पोलिसस्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला