भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार,पीक चोरी व नुकसानीने शेतकरी संतप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अनेक दिवसांपासून रावेर तालुक्यात चिनावल, रोझोदा, कुंभारखेडा,परिसरात मोठ्या प्रमाणावर पीक चोरी करून लाखो रुपयांची पीक नुकसानी केली जात आहे ,याचे लोण आता यावल तालुक्यातही पोहचले असून पीक चोरी व नुकसानीचे प्रकार घडत आहेत.

यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले उभे पिक कापून नेणे,पिकांची नासाडी करणे, पीकला आग लावून जाळून टाकणे, शेतात गुरे चारणे, विद्युत पंप, विद्युत केबल्स चोरी,शेतात बकऱ्या चराई करणे,अटकाव केल्यास शेतकऱ्याला मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत.तालुक्यातील चितोडा येथील शेतकरी दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरबरा पेटवून दिला ,
तसेच दोन-तीन दिवसापूर्वी किशोर राणे यांचे शेतात बकऱ्या चराईस मनाई केल्यावरुन राणे यांना बेदम मारहाण केली गेली आणि दुसरे दिवशी दोन हजार केळीचे घड कापून सुमारे ६ लाखाचे नुकसान केले गेले, सततच्या आशा घटनांमुळे यावल तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले ,

या प्रकाराला आळा घालण्यासंदर्भात १५ मार्च मंगळवार रोजी यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली.या बैठकीत उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील,डॉ. कुंदन फेगडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी , डॉ. निलेश गडे, हेमराज फेगडे, किशोर राणे, डीगंबर सावकारे, अट्रावलचे राजेन्द्र महाजन ,प्रमोद नेमाडे, कृष्णाजी पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, बैठकीत शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या,तर शेती पिका संदर्भात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असे आश्वासन पोलीस प्रशासना कडून देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!