यावल तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड,अवैधधंदे चालकांमध्ये खळबळ
यावल,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। यावल तालुक्यात अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरू असून तालुक्यातील दहिगाव यावल रस्त्यावरील बालाजी तोल काट्या जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने बुधवार दि.१४ रोजी सायंकाळी सात वाजता छापा टाकून रोख रकमेसह दोन लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईमुळे यावल तालुक्यातील अवैध धंदे चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्यांच्या पथकाने बुधवार दि १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील दहिगाव या गावातील दहिगाव-यावल रस्त्यावर असलेल्या बालाजी तोल काट्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगाऱ्याना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल, सहा मोबाईल, रोख रक्कम असा एकूण दोन लाख १० हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास यावल पोलिसस्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहेत.तसेच याच पथकाने दहिगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणार्या संतोष कोळी यांच्यावर कारवाई करून त्याचे जवळून १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.