पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून फूस लावुन पळवून नेऊन अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला यावल येथे सोडून संशयित पसार झाला. संशयिताने सुरत येथे नेऊन अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
डांभुर्णी गावातीलच नीलेश कुंभार याने अल्पवयीन मुलीस पळवून अपहरण केले होते. या प्रकरणी यावल पोलिसांत अपहरणाचा गुन्हा ही दाखल झाला होता. तपास सुरू असतानाच बुधवारी अल्पवयीन मुलगी पोलिस ठाण्यात धडकली.तिने पोलिसांना सांगितले की, नीलेश याने सुरत येथे नेऊन अत्याचार केले. व बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ सोडून पळ काढल्याचे सांगितले. याप्रकरणी संशयित कुंभारविरूद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून जळगाव येथे बालकल्याण समितीकडे पाठवण्यात आले. संशयित नीलेश कुंभार याचा शोध सुरू आहे.