किनगाव येथील तरुणांची गळफास लावून आत्महत्या !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील किनगाव येथील एक अविवाहित २२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आज सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून
मिळालेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील किनगाव येथे आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४: ३० वाजेच्या सुमारास येथील बाजारपटा परिसरातील रहिवासी असलेला मोल मजुरी करणाऱ्या अविवाहीत तरूणाने आपल्या राहत्या घरातील दरवाजे बंद करून छताला दोरी बांधुन दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन आई वडील हे शेतातुन मजुरी करून परतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. रवीन्द्र रमेश गायकवाड (वय २२ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरूणाने आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र समजु शकले नाहीत.
तरुणाचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी मयत तरुणांचे मामा उखा रामलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.