भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

पाच लाखांसाठी तरुण विवाहीतेच्या छळ ; सहा जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने यावल तालुक्यातील साकळी येथील १९ वर्षीय तरुण विवाहितेचा पती सह सासरच्या सहा जणांनी छळ केला तसेच लग्नामध्ये मानपान न दिल्याने तिचा मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या कारणाने तरुणीने दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलीसस्टेशनला सासरच्या नशिराबाद येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या सानिया मिर्झा इरफान शेख. वय १९ वर्ष,या तरुणीचा दी.८ मे २०२२ रोजी नशिराबाद येथील शेख इमरान शेख इरफान यांचेशी विवाह झाला होता.त्या नंतर लग्नात मानपान न दिल्याचे कारण म्हणून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असत ,तसेच माहेरहून प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून त्रास देत असत. माहेरहून पाच लाख रुपये आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिले, विवाहितेच्या  फिर्यादी वरून पती शेख इम्रान शेख इरफान ,सासरे शेख इरफान शेख उमर,सासू हसिनाबी शेख इरफान,नणंद मुस्कान शेख इरफान, मोठी सासू हूसनाबी शेख हरून, राईसाबी शेख मोसिन या सहा जणांविरोधात सानिया मिर्झा इरफान शेख. वय १९ या विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनी प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!