फैजपूर शहरतील मूलभूत सुविधा भगवान भरोसे,नागरिक त्रस्त
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर शहरातील रहिवासी नागरिकांना मूलभूत सुविधा साठी भटकंती करावी लागत आहे व मिळत नाही फैजपूर शहरात कायम मुख्य अधिकारी नसून शहरातील नागरिकांना फार त्रास सोचावा लागत आहे फेब्रुवारी महिन्यापासून पिण्याचे पाण्याची टंचाई अनेक भागात होत असताना दिसत आहे, अशी तक्रार फैजपूर एम मुसा जनविकास सोसायटी श्रमिक कोहीनूर कामगार संघटना कडून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी जळगाव फैजपूर उपविभागीय प्रांत अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे निवेदन देऊंन करण्यात आली बाहे.
शहरातील आवारा कुत्र्यांनी शहरात धुमाकुळ घातला आहे मुस्लिम शहरातील पवित्र कब्रस्तान मध्ये डुकरांचा उद्रेक सुरू आहे अनेक वेळी तक्रार केल्यावर सुद्धा नगरपरिषद प्रशासन कडून कारवाई होत नाही नगरपरिषद मध्ये कायम मुख्याधिकारी नसून आम्ही काय करणार असे उत्तर अधिकारी वर्गाकडून कडून मिळत आहे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर असलेले मुन्सिपल हायस्कूल जवळ नाल्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून नाल्यात घाण जमा झालेली आहे,या नाल्या मुळे रहिवासी नागरिक यांचे आरोग्य धोका निर्माण झाला आहे यामुळे या लहान मुले मुली नागरिकांना होणाऱ्या आरोग्याच्या परिणामाला जबाबदार कोण? लवकर नालेसफाई नाही झाली तर कामगार संघटना कडून नगरपालिका समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
या बाबत कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी सांगितले अनेक वेळी आरोग्य अधिकारी कडे तक्रार व तोंडी सांगून सुद्धा काही कारवाई होत नसल्याचा असेही ते म्हणाले मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्याचे उपवास १२ मार्च पासून सुरू झाले आहे शहरातील मूलभूत सुविधा व पाणी पाणी टंचाईमुळे नागरिकांना फार मानसिक त्रास सोचावे लागत असल्याचे चित्र शहरातील अनेक प्रभागांमध्ये दिसत आहे आता उन्हाळा पण सुद्धा नाही तर तर पाणी टंचाई होत आहे तर उन्हाळ्यात शहराची काय परिस्थिती होणार असा प्रश्न नागरिकाच्या मनात आहे तरी नगरपालिका प्रशासन या समस्येवर काय मार्ग काढणार व केव्हा कारवाई करणार असे प्रश्न शहरवासी व नागरिकेचे मनात आहे