यावल तालुक्यात बिबट्याचे दर्शन, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात नागरीकांना रात्री बिबट्याचे दर्शन झाले.परिसरातील ग्रामस्थांनमध्ये घबराट उडाली असून यावल हतनुर पाटचारी परिसर ,राजोरा, सांगवी ,बोरावल,टाकरखेडा,निमगाव व आदी ठिकाणाच्या शेतकर्यांनी काळजी घ्यावी व शेतीकामाला एकटे जावु नये तसेच या भागा सह परिसरातील नागरिकांनी काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे.
मिळालेली माहिती अशी की, यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात रात्री बिबट्याचे दर्शन झाले. काल रात्रीच्या सुमारास निमगावचे काही तरूण हे शौचास गेले असता त्यांना बिबट्या दिसुन आला. बिबटया दिसताच शौचास गेलेल्या तरुणांनी तेथून पळ काढला तसेच काही वाहनधारकांना देखील बिबट्याचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगीतले.या बाबत वन खात्याला कळविले असता यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांनी बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा देऊन लागलीच बिबट्याच्या बंदोबस्त कमी पथकाची नेमणुक केली. दरम्यान यावल हतनुर पाटचारी परिसर ,राजोरा, सांगवी , बोरावल, टाकरखेडा,निमगाव व आदी ठिकाणाच्या असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगेर यांनी केले आहे .तसेच इतरस्त्रहीही बिबट्याचा वावर असल्याचे मानले जात आहे