भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

उसनवरीचे पैसे मागीतल्याच्या रागातून विवाहितेचा विनयभंग

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उसनवरीचे पैसे मागीतल्याच्या वादातून यावल तालुक्यात विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्यातील तुषार गोपाळ पाटील, गोपाळ शामराव पाटील आणि सविता गोपाल पाटील यांना उसनवारीने पैसे दिले होते ते दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यानी महिलेला व तिच्या पतीसह बेदम मारहाण करत संशयित आरोपी तुषार पाटील याने विवाहितेचा हात पकडून अश्लिल शिवीगाळ केली. विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला व जीवे ठार मारण्याची देखील धमकीही दिली

या बाबत महिलेने यावल न्यायालयात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून बुधवार ३० मार्च रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी तुषार गोपाळ पाटील ,वय-३०, गोपाळ शामराव पाटील ,वय-५५ आणि सविता गोपाळ पाटील,वय-३६, यांच्याविरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!