यावल येथील मेडिकल मालकाची ४८ हजार रुपयाची फसवणूक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन:
यावल, प्रतिनिधी : येथील सुनिल मोतीराम भारंबे याचे जनरेलीक मेडीकल साठी ऑक्सीमीटर व मास्क साठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर कंपनिकडे ऑनलाईन ४८ हजार सातशे सोळा रुपये भरणा केला मात्र कंपनिने कोणतेही साहीत्य न पाठविता भारंबे यांची आर्थीक फसवणूक केल्यावरून भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादिरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आमचे मालकीचे मेडीकल दुकानासाठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर या कंपनिकउे फोनव्दारे ऑनलाईन ॲपवरून ४६ हजार ६५० रुपये किमतीचे ८५ ऑसीमीटर बीपीएल कंपनिचे ऑक्सीमीटर व १०० एन९५ मास्क साठी १९६६ रुपये १२ जुन रोजी ऑनलाईन भारणा केला मात्र अद्याप पावेतो कंपनिने साहीत्य पाठवले नसुन आर्थीक फसवणूक केली म्हणून कंपनिविरूघ्द येथील यावल पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.