यावल तालुक्यात अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातीलच नराधमाकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना उघळकीस आली.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात कुटुंबातील लोक शेती कामा निमित्त दि १३ जुलै रोजी शेतात कमला गेले असता अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत गावातीलच शांताराम मधनसिंग गायकवाड याने मुलीला बकऱ्यांच्या वाड्यात नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.कुटुंबातील सदस्य घरी आल्यावर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला असता त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी शांताराम गायकवाड यांच्या विरोधात यावल पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.