हिंगोणा येथे आज मुंजोबा यात्रोत्सव
हिंगोणा, ता. यावल,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। यावल तालुक्यातील हिंगोणा येथील यात्रोत्सव माघ महीन्याच्या दुसऱ्या वाराला भरत असतो सालाबाद प्रमाणे या वर्षाला मुंजांचा दुसरा शनिवार असल्यामुळे यात्रोत्सव भरत आहे तसेच मुख्य ग्रामपंचायत डोंगर हाळ चौकात लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे . तसेच फराळाचे सुद्धा वेगवेगळी दुकाने थाटलेली आहेत .
मागील दोन वर्षांत कोरोना संसर्ग प्रार्दुभावामुळे शासनाने सर्वच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी आणली होती.मात्र सध्या कोरोना नसल्याने जिल्ह्यात सार्वजानिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. तसेच हिंगोणा येथिल प्रसिद्ध असलेला बयाजी मुंजोबा महाराज यांचे मंदीर आहे . त्या ठिकाणी अनेक भावीक नवस फेडायला येतात यात्रोत्सव यंदा मोठया उत्साहात भरणार आहे.या कार्यक्रमाकरीता परिसरातील तरूण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो यात्रेनिमित्त गावात पाळणे मुलांचे खेळ्ण्याचे दुकाने लागली आहे यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मनोज वायकोळे . भरत पाटील .भुषण राणे . सागर महाजन . विष्णु महाजन . भरत नेहेते . हितेंद्र महाजन . तसेच आयोजकांन तर्फे कळविण्यात आले आहे. फैजपुर पो. स्टे तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .