अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासऱ्याचा प्रियकराच्या मदतीने खून
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तो येथे का येतो ?असा जाब विचारणाऱ्या व अनैतिक संबंधात वारंवार अडथळा ठारणाऱ्या सासऱ्याचा सुनेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे उघडकीस आली.
रावेर तालुक्यातील उदळी, येथील जावेद शाह अली शाह फकीर या तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, किनगाव ता. यावल येथील भीमराव सोनवणे ,वय ५८ यांची सून मीना विनोद सोनवणे हिच्या बहिणीचे रावेर तालुक्यातील उदळी येथे सासर आहे आणि मीना ही विवाहापुर्वी उदळी येथे यायची.तेव्हा तेथे तिची ओळख जावेद शहा अली शाह फकीर सोबत झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाहानंतर जावेद शाह हा किनगाव येथे येणे-जाणे वाढू लागले. दरम्यान, त्याचे सततचे घरात येणे भीमराव सोनवणे यांना खटकत होते.
प्रियकर वारंवार किनगाव येथे यायचा. तेव्हा तो येथे का येतो? याचा जाब मृत सासरे भीमराव सोनवणे यांनी विचारला असता त्याचा त्यांना सतत राग यायचा. यातुन ही खुनाची घटना घडली असून मृत व्यक्तीच्या सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले.
असा काढला काटा
भीमराव यांची सून मीनाबाई विनोद सोनवणे रा किनगाव हिला भेटायला जावेद शहा हा तीन दिवसांपूर्वी किनगाव ला आला होता. तेव्हा सुनेने सासर्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार सुनेचा प्रियकर जावेद हा आपल्या दुचाकीवर भीमराव सोनवणेे यांना यावल गावात घेऊन गेला. तेथे दोघानी भरपूर दारू प्यायली आणि रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने घराच्या दिशेने निघाले असता चुंचाळे जवळील पुलावर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. जावेद शाह याने भीमराव सोनवणे यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबत सांगितले.
पोलिसांनी सून मीनाबाई विनोद सोनवणे वय ३०, किनगाव याना अटक केली असून जावेद शाह अली शाह फकीर वय ३२, प्रतिभा नगर, वरणगाव, ह.मु.उदळी, ता.रावेर याला भुसावळ येथील रिदम हॉस्पिटल जवळून अटक केली, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत