भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच, चोवीस तासात दुसरा खून, दोन्ही खून कुऱ्हाडीनेच

यावल,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। १४ जानेवारीच्या मध्यरात्री यावल तालुक्यातील पिळोदा गावात लग्न लावून देत नाही म्हणून संतापाच्या भरात मुलाने आपल्या जन्मदात्या वृद्ध बापाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना ताजी असताना २४ तासाच्या आत यावल तालुक्यात दुसरा खून करण्यात आला.तालुक्यातीलच रिधुरी गावात सोमवारी दि १५ जानेवारी च्या संध्याकाळी आठ- साडेआठच्या सुमारास धनराज सोनवणे या व्यक्तीचा रस्त्याच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला, चोवीस तासात दोन खून झाल्याने तेही कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.

यावल तालुक्यातील रिधुरी गावात दि.१५ जानेवारी सोमवार रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाल्याने वाद विकोपास गेल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले त्यात धनराज वासुदेव सोनवणे, वय ५०. यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करण्यात आले. यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले. याच हाणामारीत सतीश सुखदेव सोनवणे, वय ३०, आरती सतीश सोनवणे , वय २८. हे जखमी झाले.

या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनला सोनी धनराज सोनवणे, वय ३५ रा. रिधुरी. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू असून पुढील तपास स पो नि निलेश वाघ हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!