निंबादेवी धरण ओव्हरफ्लो,धरणावर हजारो पर्यटकांची गर्दी,नियम धाब्यावर, अतिउत्साही तरुणांची धुडघुस
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतेक सर्वच प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून, या ठिकाणी वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आज रविवारी सुटीचा दिवस असल्याने निंबादेवी धरणावर हजारो पर्यटकांनी मोठी गर्दी केली .
जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चिंचपाणी, मनुदेवी, वाघझिरा व निंबादेवी धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. याठिकाणी ट्रेकिंगसह पाण्यात डुंबण्याचा आनंद घेता येत असल्याने अनेक जण विकेंड घालवण्यासाठी येथे येत आहेत.
या ठीकणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही अथवा पाटबंधारे चे अधिकारी,या ठीकाणी शासनाच्या नियमांची सऱ्हास पायमल्ली होताना दिसत आहे,येथे अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघातही घडल्याची उदाहरणे आहेत,प्रशासनाचे आदेश म्हणून पाटबंधारे खात्याकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात परंतु तरीही प्रशासनाचे आदेश धुडकाऊन पर्यटकानी मोठी गर्दी केलेली पहायला मिळते.