फैजपूर येथे एकदिवसीय “सामुहिक श्री गजानन विजय महापारायण”
फैजपूर, ता.यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फैजपूर येथे जय गजानन गृप तर्फे आयोजित श्री गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे १३ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापरायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापारायण मुखोद्गत वक्ते मु कराड जिल्हा सातारा येथील श्री जयंत मराठे व सौ संजीवनी मराठे यांच्या रसाळ वाणीतून फैजपुरातील शिवाजी नगरात सकाळी साडे सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत होणार आहे.श्री व सौ मराठे यांचा श्री गजानन विजय ग्रंथ जसाच्या तसा तोंडपाठ असून ज्या भाविकांकडे ग्रंथ नसेल त्यांना वाचण्यापुरता ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. शारीरिक दृष्टया बसण्यास असमर्थ असलेल्याना महापारायणा साठी खुर्चीची व्यवस्था केलेली आहे.तसेच महापारायण करणाऱ्यासाठी सकाळी फराळ व दुपारी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.
फैजपूर येथील शिवाजी नगरात आयोजित केलेल्या या महापरायणा साठी सुमारे ११०० भाविक महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात येथून आवर्जून हजर असतात.तसेच या महापारायणाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज सतपंथरत्न फैजपूर हे उपस्थित राहणार आहेत.सर्व पारायण कर्त्यांसाठी फराळ व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व गजानन भक्तांनी या परायणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती वजा आवाहन दीपक होले,तुकाराम चौधरी, तुळशीराम काठोके, गजानन भारुडकर सर,विक्रम महाले सर,ठाकूर किरंगे,पुष्पा बोरोले मॅडम, आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.