यावल तालुक्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील मनवेल येथील गोवर्धन बळीराम भालेराव, या ६५ वर्षीय वृध्दाने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
या बाबत अधिक वृत्त असे की, यावल तालुक्यातील मनवेल या गावातील गोवर्धन बळीराम भालेराव, वय ६५ याना गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने ग्रासले होते , नेहमीप्रमाणे घरातील सदस्य शेतात कामाला निघून गेले असता गोवर्धन नाती सोबत घरीच होते. त्यांनी नातीला चहा बनविण्यासाठी सागीतले व घरा शेजारी असलेल्या छप्परात छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना दि १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.या बाबत यावल पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.