पिंपरुड येथे देशी व हातभट्टी दारूची खुलेआम अवैध विक्री
विरोदा, ता.यावल, मंडे टू मंडे न्युज, दीपक तायडे। यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरुड येथे देशी व गावठी हातभट्टी दारूची6 खुलेआम सर्रास अवैध पणे विक्री केली जात असून या कडे आर्थिक लाभापोटी स्थानिक प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील पिंपरुड येथे वाढोदा रस्त्यावर देशी व गावठी दारू अवैध पणे मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे तसेच मोठ्या पुलाजवळ इंजिन घरातच देशी व गावठी दारू विकली जात असून पिंपरुड गावात सुद्धा असेच दोन ते तीन दारूचे अड्डे असून येथे सुद्धा अवैध दारू विकली जात आहे ग्रामस्थ या प्रकाराला त्रासले असून पण या भानगडीत पडतो कोण ?
येथे खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते हे पोलीस प्रशासन व दारू बंदी खात्याला या बद्दल माहिती नाही असे नाही, मग कारवाई का होत नाही? आर्थिक हितसंबंध तर जोपासत नाहीना?