भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

फैजपुर नगरपरिषदेत भोंगळ कारभार, ४३ सफाई कामगारांचे चार महिन्याचे पगार थकले

फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील गेल्या चार महिन्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली परंतु नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी अद्याप पर्यंत मिळाला नाही. तात्पुरता पदभार भुसावळ चे मुख्य अधिकारी महेश वाघमोळे यांना देण्यात आलेला आहे

त्यामुळे कोणतेही नियंत्रण नगरपरिषदेत राहिलेले नाही वेगवेगळ्या समस्या बाबत नागरिक कंटाळले असून कचरा साफसफाई, दिवाबत्ती, तसेच गावातील अनेक गटारी तुंबल्या असून नागरिकांना कोणतीही सुविधा मिळत नाही, मात्र लाखो रुपयांचे बिले मात्र सादर होऊन काढली जात आहेत.

कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नसताना शहरातील कचरा साफसफाई होत नसताना मात्र लाखो रुपयांची बिले कसे अदा होत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून दिवाबत्तीचे सुद्धा लाखो रुपयांची बिले कसे काढून दिले जातात, फैजपुर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

४३ सफाई कामगारांचे चार महिन्यापासून पगार थकले
येथील नगरपरिषदेच्या ४३ सफाई कामगारांचे गेल्या चार महिन्याचे बिल थकले असून सफाई कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे ठेकेदार हा ठेका सोडून निघून गेला असल्याची माहिती मिळत आहे, कामगार येत्या दोन-चार दिवसात थकीत बिल न मिळाल्यास सफाई कामगार नगरपरिषदे समोर तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे

याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या चार महिन्यापासून येथील सफाई कामगार यांनी नगरपरिषद आणि ठेकेदाराच्या आदेशानुसार शहरात सर्वत्र साफसफाई सह गटारी या कामांसाठी ठेकेदार आणि नगरपरिषदेकडून सफाई कामगारांना काम देण्यात आले होते परंतु त्या चार महिन्यापासून ठेकेदारांकडे तीन महिन्याचे बिल थकीत असून आणि नगरपरिषदे कडे एक महिन्याचे बिल थकीत आहेत ते न दिल्यामुळे एकूण चार महिन्याचे साफसफाई कामगारा चे बिल थकीत झालेले आहे सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून सफाई कामाचे बिल न मिळाल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून येत्या दोन ते चार दिवसात या सफाई कामगारांना त्यांचे कामांचे पैसे न मिळाल्यास एकूण ४३ साफसफाई कर्मचारी हे तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी पत्रकाराशी बोलताना दिला आहे, ठेकेदार ठेका सोडून दिला असून चौकशीची मागणी केली जात आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!