गोळ्या -बिस्कीट च्या नावाखाली फैजपूर परिसरात अवैध गुटख्याची सर्रास
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फैजपुर सह परिसरात विमल गुटख्याची विको व्हॅन गाडीने अवैधरित्या बिनधास्त विक्री सुरू असून बटाटा चिप्स , पोंगा पंडित, बालाजी सेव – चिवडा, आणि गोळ्या- बिस्किट च्या नावाखाली केवळ विमल गुटख्याची विक्री इको व्हॅन द्वारे करण्यात येत
आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर शहर व परिसरात अवैध विमल गुटखा विक्री जोमात सुरू असून याला महाराष्ट्र राज्य शासनाने बंदी घातलेली असताना सुद्धा येथे विमल गुटखा सहज उपलब्ध होत असतो. फैजपूर शहर ही मोठी बाजारपेठ असून अवैध गुटख्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
फैजपूर येथीलच बाहेरपेठ परिसरातील एक व्यक्ती इको गाडीत गोळ्या बिस्कीट, पोंगा पंडित, बालाजी सेव चिवडा, वेफर्स आदीच्या नावाखाली फैजपूर सह साखर कारखाना परिसर, हंबर्डी, हिंगोणा,आमोदा, बामनोद, पडाळसे, भलोद,सह आदी परिसरात इको व्हॅन द्वारे बिनधास्त पणे वाहतूक करून विक्री केली जात असून हा प्रकार पोलिसांना माहिती नसावा? आशीर्वादा शिवाय हे शक्य आहे का?