यावल तालुक्यात विवाहितेचा विनयभंग, रावेर तालुक्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल
फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील बामणोद येथे विवाहितेच्या घरात घुसून तिचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी रावेर तालुक्यातील वाघोदा येथील व्यक्ती विरोधात फैजपूर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील वाघोदा येथील शुभम वाघ याने यावल तालुक्यातील बामणोद येथील ३५ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून ती स्वयंपाक करीत असताना तिचा हात पकडून तिच्या पतीला शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला या बाबत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून फैजपूर पोलिसस्टेशनला शुभम वाघ, रा.वाघोदा.ता.रावेर याचे वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि निलेश वाघ यांचे मार्गदर्शना खाली पो का बाळू भोई हे करीत आहेत.