रेशनिगच्या तांदुळाचा काळाबाजर : ३० टन तांदुळासह ट्रक जप्त !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील वाटप करण्यात येणार रेशनिंगचा तांदूळ कापडणे – चोपडा – यावल मार्गे गोंदिया येथे ३० टन तांदूळ काळाबाजारात नेण्यात येत असताना यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतला होता. यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह अन्य ३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे नेण्यात येत असलेला शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणासाठी ट्रक जात असल्याची गोपनीय माहिती पो नि सुधीर पाटील यांना २३ ऑक्टोबररोजी मिळाली. त्यानुसार स फौ मुझफ्फर खान समशेर खान, पो हे कॉ असलम खान, चालक रोहिल गणेश, पो कॉ सुशील घुगे यांच्यासह पथक यावल-चोपडा रोडवर हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तांदुळाने भरलेला ट्रक ( क्र एमएच १८ एसी ८४७) येताना दिसून आला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता. त्यात ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ असल्याचे आढळून आले. ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्याची कसून चौकशी केली असता हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी ( रा. चोपडा ) यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, निलेश राजेंद्र जैन ( रा. कापडणे ता.जि.धुळे ) यांच्या कापडणे येथील गोडाऊन मधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गितीका पराबोलिक इंडस्ट्रीज येथे जात असल्याचे सांगितले.
यावल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन जमा केला आहे ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय-३८, रा. आकाश गार्डन समोर, शहादारोड, शिरपुर ) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीज येथील गोडाऊनला भेट दिली त्या ठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले दोन महिन्यात १७० टन तांदूळ काळाबाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे. स फौ मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज वाणी , निलेश जैन, संतोष पाटील आणि केदार गुरव या चार जणविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे.