रेशनदुकानावरील सेल्सम्यानची धमकीचा कंटाळून आत्महत्या !
फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील आमोदा शेत शिवारातील शेत विहिरीत सोमवारी २८ मार्च रोजी सायंकाळी ५६ वर्षीय व्यक्तीने जांचाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून व्यक्तीकडे सुसाईड नोट आढळून आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील रेशनदुकानावर सेल्समन म्हणून काम करत असलेल्या अशोक वामन भंगाळे (लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ, मूळ रहिवासी आमोदा, ता.यावल) सोमवारी २८ मार्च रोजी ते दुचाकी घेऊन आमोदा येथे जाण्याकरीता भुसावळातून निघाले. सायंकाळ झाली मात्र ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोबाईलवर केला. परंतू कॉल एका वेगळ्याच इसमाने उचलला आणी दुचकीच्या डक्कीत मोबाईल सोडून व्यक्ती गेली कुठे असे शोधतांना विहिरीत अशोक भंगाळे यांचा मृतदेह आढळून आला.
सदरील मृतदेहा जवळ सुसाईड नोट मिळाली असून त्यात नमूद आहे की, “भुसावळ येथील संशयित आरोपी मुन्ना सोनवणे पूर्ण नाव माहीत नाही हा रेशन दुकानात येवुन एक वर्षाचे रेशन धान्य फुकट द्यावे, म्हणून वारंवार त्रास देवून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता”. या धमकीला घाबरुन व आरोपी मुन्ना सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून अशोक भंगाळे यांनी आमोदा शिवारातील शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात संशयित आरोपी मुन्ना सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहे.