खा.रक्षा खडसे च्या उपस्थितीत कोविड नियंत्रणासाठी यावल तहसीलला आढावा बैठक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। यावल तहसील कार्यालयात खा. रक्षा खडसे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.23 रोजी दुपारी आढावा बैठक घेण्यात आली यात कोविड संदर्भात महत्त्वाची चर्चा सुद्धा झाली.भाजपतर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले.
राज्यात covid-19च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाग्रहात दि.23 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर रक्तपेढी च्या डॉक्टरांनी या शिबिरासाठी उपस्थित राहून रक्तदान शिबिर करून घेतले त्यात35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना गौरव प्रमाणपत्र या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.शिबिराचे उद्घाटन रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा रक्षाताई खडसे भारतीय जनता पार्टी. जिल्हाअध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा सौ. रंजना पाटील,जि.प.आरोग्य समिती सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील पं.स. सभापती सौ.पल्लवी पुरुजीत चौधरी.जि.प.माजी सभापती हर्षल पाटील, जि.प.सदस्या सौ.सविता भालेराव, पं.स.माजी सभापती तथा भाजपा गटनेता दिपक अण्णा पाटील, डांभुर्णी उपसरपंच पुरुजित चौधरी, फैजपूर माजी नगराध्यक्ष पिटू राणे, पी.एस. सोनवणे सर यांच्यासह ईतर मान्यवर याप्रसंगी प्रमुख म्हणून उपस्थीत होते
रक्तदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत,अतुल भालेराव, वड्री सरपंच अजय भालेराव,भाजपा युवा तालुका अध्यक्ष सागर कोळी, शहर भाजपा अध्यक्ष डॉ.निलेश गडे नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,रितेश बारी व्यंकटेश बारी,परेश नाईक,भुषण फेगडे,यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.
राहूल बारी यांचा भाजपामध्ये प्रवेश- यावेळी खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत राहूल बारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला,जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.