190 ची बियर 350 रुपयात कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर ठेवून मद्यपींची आर्थिक लूट.
Monday To Monday NewsNetwork।
यावल/प्रतिनिधी: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार आणि नियमानुसार यावल शहरात देशी दारू विक्रेते आणि बियर बार विक्रेते मनमानी करीत अव्वाच्या सव्वा दरात देशी दारू आणि बियर विक्री वाजवीपेक्षा जास्त दरात विकून म्हणजे190रुपयाची बिअर350 रुपये विक्री करून मद्यपीची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहेत,बियर दुकानात,देशी दारू दुकानात मूळ मालकाऐवजी इतर व्यक्ती व्यवसाय करीत आहेत याकडे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागातील दुय्यम निरीक्षक यांचे व यावल पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
यावल शहरात आज एका बियर दुकानदाराच्या कर्मचाऱ्याला आज दि. 10संध्याकाळी यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल शहरातील देशी दारू दुकानदार,बियर बार दुकानदार तसेच अवैध हातभट्टी, देशी दारू विक्रेत्यांची राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि यावर पोलिसांनी संयुक्तीक कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.यावल शहरात फालक नगर कडून महाजन गल्लीत जातानाच्या रस्त्यावर तसेच यावल शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच आणि गल्लीबोळात अवैध बोगस हातभट्टीची आणि देशी दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तसेच यावल शहरात ठिकठिकाणी जागोजागी खुलेआम देशी दारू कोणाच्या आशिर्वादाने विक्री होत आहे याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.