भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

समरसता महाकुंभात होणार श्री जगन्नाथ गौशाळेचे भूमिपूजन

फैजपूर,मंडे टू मंडे न्युज । श्री सतपंथ मंदिराचे अकरावे गादीपती परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री जगन्नाथ गौशालेचे भूमिपूजन संतमहंतांच्या हस्ते वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम परिसरात होणार आहे. दि. 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित समरसता महाकुंभाचे निमित्त हे भूमिपूजन होईल.

अध्यात्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाईच्या दुधाचा, गोमुत्राचा व शेणाचा वापर देखील दैनंदिन जीवनात केला जातो. गोमूत्र एक उत्तम औषधी असल्याचेही अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या तर अनेकांतर्फे गायींना मोकळे सोडून दिले जाते अथवा गोशाळेत दान दिले जाते. अशा गायींवर उपचार करणे व त्यांचे पालनपोषण करणे यासाठी फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ गौशाला उभारण्यात येणार आहे. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभात सतपंथ मंदिराच्या अकरावे गादीपती गुरूदेव श्री जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री जगन्नाथ गौशाळा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे. भविष्यात गायींचे पालनपोषण आणि गायींची निगा राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री जगन्नाथ गौशाळेच्या माध्यमातून सर्व सुखसोयींनी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!