भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

समरसता महाकुंभ ; संतांच्या आगमनामुळे उद्या २८ डिसेंबर पासून श्री निष्कलंक धाम मध्ये प्रवेश बंद

फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। समरसता महाकुंभाच्या निमित्त दररोज परिसरातील नागरिक निष्कलंक धाम वढोदा येथे मोठ्या संख्येने कुटुंबासह बघण्यासाठी येत आहेत. दिनांक २९, ३० आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी वढोदा (फैजपूर) येथील निष्कलंक धाम येथे होणाऱ्या समरसता महाकुंभ कार्यक्रमास देश विदेशातील थोर संत महंत येणार आहेत त्या नुसार २८ तारखे पासून निष्कलंक धाम या ठिकाणी संतांचे आगमन होणार असल्याने दि. २८ डिसेंबर रोज बुधवार पासून निष्कलंक धाम येथे संतांव्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दिनांक २९ डिसेंबर पासून नियोजित कार्यक्रम संपन्न होणार असल्याने सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!