सावदा -फैजपूर रस्त्यावर हिरवीगार झाडाची खुलेआम कत्तल, अद्याप कारवाई नाही? अधिकाऱ्यांची दिरंगाई?
फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा -फैजपूर रस्त्यावर हिरवीगार झाडाची कुठलीही परवानगी न घेता अवैध कत्तल करण्यात आली आहे. यावर आद्यप कुठलीही कारवाई केलेली नाही कारवाई करतो आहे असे सांगितले जाते. दिरंगाई होत असल्याचे दिसते .
सावदा -फैजपूर रस्त्यावर धनाजी नाना महाविद्यालयाच्या बाजूला हायवे लागत असलेल्या न्यू विश्वकर्मा फर्निचर समोरील सुलमोहोर चे भले मोठे हिरवेगार झाड ४ आक्टोबर बुधवार रोजी संध्याकाळच्या सुमारास खालूनच तोडण्यात आले याची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं वृक्षतोड करणाऱ्यांनी खुद्द सांगितलं तसेच फॉरेस्ट च्या माणसाने हे झाड तोडायचे सांगितल्याचे त्यांनी सांगितले, हा फॉरेस्ट चा व्यक्ती कोण? या बाबत चौकशी केली असता रिटायर कर्मचारी असल्याचे समजले. दिवसाढवळ्या हायवेवर हिरवीगार झाडे जमिनी पासून कापून कत्तल केली जाते हे कुठल्याही अधिकाऱ्याला दिसत नाही काय? ही गंभीर बाब असून यात संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत? याची चौकशी होईल काय? याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत वरिष्ठांकडून होईल का?
दरम्यान, झाड तोडल्या बाबत दंड भरून देणार असल्याचे समजले, म्हणजे हिरव्यागार झाडाची कत्तल करायची व पकडले गेले तर दंड भरून द्यायचा?अशी कित्येक हिरवी गार झाडे कापली जात आहेत संबंधित अधिकारी मात्र ही झाडे विकून रुपये गोळा करण्यात मग्न आहेत.