डॉ.विजय सोनजे यांची “एनमुक्टो” च्या केंद्रीय सहसचिव पदी निवड
फैजपूर, ता.यावल.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। नुकत्याच झालेल्या “एनमुक्टो” केंद्रीय कर्यकारणीच्या बैठकीत “एनमुक्टो” च्या केंद्रीय एक्झिक्युटिव्ह बोर्डवर प्रा.डॉ.विजय सोनजे यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली, त्यांच्या नियुक्तीस महाराष्ट्र फेडरेशन ऑफ कॉलेज टीचर्स ऑर्गनाईजेशन चे अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे यांनी मान्यता देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.विजय सोनजे हे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे,कार्यरत आहेत त्यांचे संगटन कौशल्य, संगटनेच्या ध्येय धोरणाशी असलेली एकनिष्ठता, नवीन प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी आवाज उठवण्याची जुजबी वृत्ती,शांत व संयमाने परंतु सडेतोड मुद्दे मांडण्याचे कसब हे पाहूनच भारतातल्या बुद्धिजीवी प्राध्यापक संघटना म्हणून ओळखली जाणारी सर्वात मोठी संघटना “एआयफूक्टो” सलग्न असलेली आमची एनमुक्टो संघटनेचे केंद्रीय एक्झिक्युटिव्ह बोर्डवर त्यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे असे मत राज्य पातळीवरील एमफुक्टो चे माझी अध्यक्ष डॉ. संजय सोनवणे यांनी सांगितले, तसेच एनमुक्टो चे माजी अध्यक्ष डॉ अनिल पाटील यांनी ही सांगितले की डॉ.विजय सोनजे यांच्या माध्यमातून नवीन प्राध्यापकांच्या समस्या समजून घेता येतील व योग्य न्याय देता येईल याची मला पूर्ण खात्री आहे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.सोनजे यांच्या निवडीबद्दल प्रा.ई.जी.नेहते-खजिनदार “एमफुक्टो” व सिनेट सदस्य कबचौउमवि,जळगाव, डॉ.गौतम कुवर माजी सचिव, डॉ. नितीन बाविस्कर प्र.अध्यक्ष, डॉ.डी.बी.पाटील प्र.सचिव, डॉ.महेश गांगुर्डे प्र.उपाध्यक्ष, प्राचार्य डॉ.महेंद्रसिंग रघुवंशी व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव, प्रा. सुनिता पालवे- व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव,तसेच डॉ.सुधीर पाटील, डॉ.दिनेश पाटील, डॉ.अविनाश निकम,प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे,डॉ.आधार पाटील (बोरसे), प्राचार्य प्रभाकर महाले, प्राचार्य डॉ.सुनील लोहार, डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ.ताराचंद सावसाकडे व उपस्थित सर्व एकझिक्युटिव्ह मेंबर आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी एकमताने ठरावास मान्यता देवून अभिनंदन केले.
डॉ. सोनजे यांच्या निवडीबद्दल माजी. उच्च शिक्षणमंत्री भैय्यासाहेब राजेश टोपे व त्यांचे निकटवर्तीय डॉ.खेडेकर साहेब, आ. शिरीष चौधरी, अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, संस्थेचे सर्व सन्मा.पदाधिकारी, प्राचार्य.डॉ.आर.बी.वाघुडदे, प्राचार्य डॉ.एच.ई.महाजन, डॉ. एस. ए. पाटील,ऐनपुर डॉ.महेंद्र सोनवणे, डॉ.गणपत ढेंभरे, डॉ.प्रल्हाद पावरा, डॉ.अर्जुन पाटील, रावेर पं स माजी उपसभापती सावळे मॅडम, संदीप सावळे, प्रा.डॉ.विजय सिरसाठ, तसेच त्यांच्या महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी , आप्तेष्ट मित्र परिवार, सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.