भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

प्राण्यांनी अर्धवट खाल्लेल्या नऊ महीन्याच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यात प्राण्यांनी अर्धवट खाल्लेले नऊ महीन्याच्या बाळाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील सातोद या गावात इंदिरानगर परिसरात पूर्ण नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्धवट खाल्लेले नऊ महीन्याच्या बाळाचे मृतदेह मिळुन आले ,सातोद येथील इंदिरानगर परिसरात मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी याना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी या बाबत पोलिसस्टेशनला माहिती कळविली पोलिसांनी त्या अर्ध शरीर असलेल्या मृत बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, हे बाळ कुणाचे या बाबत अद्याप कुठलीही माहिती प्राप्त झाली नसून अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावे, बदनामीच्या भीती पोटी हे बाळ टाकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या बाबत यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!