धक्कादायक ; यावल मध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणी व महिलेचा विनयभंग
यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल शाहरात दि, २८ मे रविवार रोजी दोन महिलांचा वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्या. यावल शहरात एका ठिकाणी एक विवाहित महिलेचा साडी ओढून विनयभंग केल्याची घटना घडली असून दुसऱ्या ठिकाणी यावल शहरातील प्रसिद्ध मॉल मध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली,आशा दोन्ही घटना मधील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, यावल शहरात राहणारी विवाहिता दि.२८ मे रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास घराच्या ओसरीत ओट्यावर झोपलेली असतांना अंकुश गोविंदा कोळी याने साडी ओढून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्या अंकुश कोळी याने
पळ काढला.
या बाबत महीलेने दिलेल्या फिर्यादी वरून अंकुश कोळी याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्यात येऊन अंकुश कोळी याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात यावल शहरातील एका मॉल मध्ये काम करणाऱ्या एका तरूणीचा विनयभंग केल्याची दुसरी घटना घडली,
रविवार २८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास
यावल शहरातील भुसावळ मार्गावरील मुख्य चौकात असलेल्या एका प्रसिद्ध मॉल मध्ये कॅश काउंटर वर कामास असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख रा. आयशा नगर, यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉलमध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवून तरुणीच्या जवळ आला असता “तु मला आवडते, तु माझ्याशी लग्न करणार का, तु माझ्या घरी ये आपण मजा करू” असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख रा. आयशा नगर, यावल याला अटक करण्यात आली असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व कॉस्टेंबल संजय देवरे हे करीत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा