धक्कादायक ; अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील शिवारातील एका शेतात धमकी देत १६ वर्षीय मुलाकडून वारंवार एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. यातून पिडीत गर्भवती राहिली असून याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पिडीत १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.सन २०२१ पासून वेळोवेळी पिडीता इतर महिलांसोबत शेत मजुरीसाठी कामासाठी शेतात जात होती. तेव्हा तिची ओळख १६ वर्षीय तरूणा सोबत पिडीतेची ओळख झाली. ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर संशयित आरोपी याने पिडीतेशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच पिडीतेस धमकी देवून तिच्यावर जबरदस्ती केळीच्या शेतात वारंवार अत्याचार केला. यातून पिडीता गरोदर झाली. अखेर १ ऑक्टोंबर रोजी पिडीतेने यावल पोलिसात फिर्याद दिली.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पो. उप निरीक्षक सुदाम काकडे हे करीत आहेत.