हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात फैजपूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंगदल चा मूक मोर्चा
फैजपूर ता यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। देशभरात हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंगदल कडून मूक मोर्चा फैजपूर येथे काढण्यात आला.
सदर मुकमोर्चास शहरातील श्रीराम मंदिर येथून खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात येऊन पेहेडवाडा – सरफगल्ली – मोठा हनुमान मंदिर – सुभाषचंद्र बोस चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग – हुतात्मा बापू वाणी चौक – बस स्थानक मार्गे नगरपालिका – प्रांताधिकारी कार्यालय वर नेण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी यांच्या वतीने उपसहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन लोखंडे, एम आय शेख यांनी शास्त्री भक्ती किशोरदासजी
,शास्त्री
अनंतप्रकाश,पुजारी राममनोहर दासजी,कन्हैया दासजी महाराज
,विश्वहिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश भंगाळे ,बजरंग दल जिल्हा संयोजक विक्की भिडे,तालुका संयोजक लोकेश कोल्हे, नरेंद्र नारखेडे ,अनिरुद्ध सरोद नितीन राणे, यांच्या कडून सदर निवेदन स्वीकारले.
सदर निवेदन म्हटले आहे की – आपल्या देशात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत. राजस्थान मधील कन्हैय्यालाल व अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या हत्या या जिहादी तत्वानीच केल्या आहेत. याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे हिंदूंना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा देश नक्की संविधानाच्याच आधारे चालत आहे काय? हेच कळत नाही.असा उल्लेख मांडला आहे
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत. यावेळी भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते ,सरचिटणीस संजय सराफ, जितेंद्र भारंबे, नरेंद्र चौधरी, सौ जयश्री चौधरी, सौ दिपाली झोपे, माजी नगरसेवक संजय रल,प्रा जी के महाजन ,दीपक पाटील, दीपक कापडे ,हर्षल महाजन, युवराज किरंगे,निरज झोपे,रितेश चौधरी, किरण चौधरी, संदीप भारंबे ,राजेश महाजन, दीपक होले, भाजपाचे ओ बी सी जिल्हा उपाध्यक्ष पिंटूभाऊ तेली, युवा मोर्चा उपाध्यक्ष वैभव वकारे व रामा होले ,अक्षय परदेशी, जितेंद्र वर्मा ,चंद्रकांत भिरुड, मनोज चौधरी,ईश्वर रल,विनोद परदेशी,गुड्डू हिरे, यासह हिंदूवादी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते