भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर-पिंपरुड फाटा दरम्यान जिवंत मोठ्या हिरव्यागार झाडाची कत्तल

फैजपूर, ता.यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। यावल तालुक्यातील रस्त्यावरील झाडे वाहतुकीला अडताय, कोरडे झाले, च्या नावाखाली अथवा फक्त फांद्या तोडायच्या आहेत च्या नावाखाली सऱ्हास वृक्षतोड केली जात असून तक्रार झाल्यास यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किरकोळ पावती फाडली जाते, यात अधिकारीच व्यापाऱ्यांना घेऊन येत असल्याची माहिती मिळत आहे.

फैजपूर भुसावल रोड वर फैजपूर ते पिंपरुड फाटा दरम्यान वावडीचे मोठे हिरवेगार झाड फांद्या अडताय म्हणून फांद्या तोडण्या सोबत पूर्ण झाड तोडले गेले, आता त्या ठिकाणी फक्त सात ते आठ फुटाचे खोड उभे आहे.या बाबत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन कर्मचारी जंजाळे यांच्याशी या बाबत विचारले असता त्यांनी यावल बांधकाम विभागाचे रावसाहेब निबाळकर यांचे कडे बोट दाखविले त्या नुसार निंबाळकर साहेबाना या बाबत विचारले असता त्यांनी जंजाळे याचे कडे बोट दाखविले म्हणजेच हा प्रकार संगनमताने घडल्याची माहिती मिळत आहे, संबंधित अधिकारी यावल येथील दोन व्यापाऱ्यांना स्वतः सोबत घेऊन त्यांना ते झाड विक्री करून जागीच व्यवहार केल्याचीही माहिती मिळत आहे,


हे झाड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असले तरी झाड कापण्यासाठी त्याची परवानगी घेणे आवश्यक असते , पुन्हा नगरपालिकेच्या हद्दीत असल्याने नगरपालिकेची परवानगी सुद्धा आवश्यक असते परंतु अशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले गेले, अशी हिरवीगार झाडे शेतकऱ्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कापली जातात. ही हिरवीगार झाडे तोडण्यास अधिकाऱ्यांची संमती असल्याचे बोलले जात असून सावखेडा, परसाडे, डोंगर कठोरा, कठोरा,भलोद, बामणोद,विरोदा- पिंपरुड- फैजपूर रस्त्यावरील कित्येक झाडे तोडण्याचे यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त एक हजर रुपयांची पावती फाडली गेली तेही सुटीच्या दिवशी ,या मागे काय गौडबंगाल आहे?

त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी यावल तालुक्यातील च सांगवी येथे पुलाजवळ हाद्दू व करण ची अशी दोन हिरवीगार झाडे कापली गेली ,त्या नंतर ती नदी पत्रात आणून टाकली गेली या बाबत तक्रारी झाल्याने जप्त करण्यात आली, पण या मागे कोण कोण होते, कारवाई ही थातुरमातुर करण्यात आली. कारवाई करणाऱ्यांचाच हात या मागे असल्याची माहिती मिळाली आहे , तक्रार झाली म्हणून कारवाई केली असा तो प्रकार आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी फैजपूर पिंपरुड फाट्या पासून आमोदा, बामणोद ,पाडळसा या भुसावल रोडवर ४० ते ५० झाडे वाऱ्याने पडली होती तेव्हा सुध्दा मोठे गोडबंगाल झाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!