भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात शिपाई कर्मच्याऱ्याची आत्महत्या

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचारी नामदेव दगडू खैरनार याने राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रमशाळेत नामदेव दगडू खैरनार ,वय-५६. रा. वड्री ता. यावल, सफाई कामगार म्हणून काम करीत होता, यांनी सोमवारी ८ मे रोजी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. नामदेव खैरनार हे २०१६ पासून डोंगरकठोरा आदिवासी आश्रम शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळीच नामदेव खैरनार यांनी वड्री येथे राहणाऱ्या मोठ्या मुलाला फोन करून मला माझ्या लहान मुलाशी बोलायचे आहे, असे म्हणाले परंतु लहान मुलाशी बोलणे झाले नाही. त्यावेळी त्यांनी मोठ्या मुलाला माझी तब्येत खराब आहे व मला भेटायला ये असे सांगितले. तसेच माझ्या खिशातील चिठ्ठी वाचुन घ्यावी असे सांगीतल्याने मुलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान भेटण्यासाठी मोठा मुलगा आणि सून हे आले असता त्यांच्या येण्या आधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नसून घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला,पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!