हिंगोण्यात अपंग तरुणांची आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
हिंगोणा (प्रतिनिधी): यावल तालुक्यातील हिंगोणां येथील रहिवासी असलेल्या अपंग युवकाने आज रोजी दुपारी गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की , हिंगोणा येथे लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमात लागणारे साहित्य व मंडपचा व्यवसाय सुरू केलेल्या धीरज धनसिंग पाटील हे एका हाताने व पायाने अपंग व्यवसायासाथी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी गावातीलच दशरथ पाटील यांचे घर भादे तत्वावर घेतले होते आज दुपारी त्या ठिकाणी त्याचे मजूर ३:२५ वाजेच्या सुमारास मंडपचे सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत धीरज पाटील दिसून आल्याने त्यांनी लागलीच येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला याप्रकरणाची माहिती दिल्याने पोलिसानी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह यावल रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नसून यासंदर्भात फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.