यावल तालुक्यात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला अटक
फैजपूर, ता. यावल.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ सार्वजनिक जागी चौकात तलवार घेऊन दहशत दाखविणाऱ्या सराईत गुन्हेगार डॉन उर्फ प्रविण गोपाळ तायडे, वय २८ वर्ष रा. पाडळसा. ता. यावल. या तरुणाला फैजपूर पोलीसानी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे जवळून पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील पाडळसा या गावाला कोसगाव कडे जाणाऱ्या रोडवर चौकामध्ये सार्वजनिक जागी सराईत गुन्हेगार डॉन उर्फ प्रविण गोपाळ तायडे, वय २८ वर्ष रा. पाडळसा. ता. यावल. हा स्वताः जवळ लोखंडी धारदार तलवार बाळगुन गावात मोठमोठ्याने आरडा ओरड करुन दहशत निर्माण करीत होता. या संदर्भात फैजपूर पोलीसस्टेशनचे सपोनि. निलेश वाघ यांना माहिती मिळाल्याने त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता तातडीने कारवाई करत सदर इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपयांची लोखंडी तलवार जप्त केली आहे. सदर इसमावर फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हां दाखल करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. प्रवीण उर्फ डॉन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, अवैध दारू विक्री, धमक्या असे वेगवेगळे गुन्हे दाखल असून सावदा पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांचेवर चोरीचा गुन्हां दाखल आहे. गुन्हां केल्यापासुन सदर इसम हा फरार होता.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, परि. पोउपनिरी. विनोद गाभणे, पोहेकॉ. विकास सोनवणे, पोहेकों. मोती पवार, पोहेकॉ बाळु भोई, पो.कॉ. राहुल महाजन, चालक सहा. फौ. अरुण नमायते अशानी केली आहे.