भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला अखेर अटक

फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील हिंगोणा गावा जवळच्या मोर धरण परिसरात एका ४० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपी खुमसिंग सरदार बारेला याला अटक करण्यात आली आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी की , एक ४०वर्षीय महिला खुमसिंग सरदार बारेला वय ३३ वर्ष ( मुळ राहणार खिरवड तालुका रावेर हल्ली मुकाम मोर धरणाजवळ हिंगोणा ) याच्याकडे आली. तिने खुमसिंग याच्यासोबत राहण्याचा हट्ट केला. मात्र खुमसिंग याने सदर महिलेस सांगीतले की तुझ्यामुळे माझा संसार खराब होइल,तू निघून जा, असे तिला वारंवार बोलुन समजवण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची महीला ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयीत आरोपी सुमसिंग सरदार बारेला यांने संतापाच्या भरात ब्लेडने त्या महिलेच्या गळ्यावर करून नंतर तिला विहीरीत ढकलुन दिले. याचा उलगडा आता झाला आहे. सदर महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले आहे.

मात्र ही महिला कोण? या बाबत ओळख पटलेली नसल्याचे कळते. या बाबत खुमसिंग बरेला विरूद्ध फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!