आमोदा येथील पशुवैद्यकीय अधिकारीच येत नसल्याने दवाखाना बंद
आमोदा,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालक यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि नागरिकांना गाई,म्हशी, शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे इ.प्राण्यांवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागते तसेच जर पशुवैद्यकीय अधिकारी कोण्या दिवशी उपस्थित असला तरी सरकारी नियमाने फी वसूल न करता शेतकऱ्यांन कडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात येते व औषधी ,गोळ्या उपलब्ध करून दिल्या जात नाही तसेच पशुवैद्यकीय अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून शेतकऱ्यांनी त्यांना कॉल केला असता आम्ही सुट्टीवर आहे असे सांगण्यात येते व शेतकरी व पशुपालक यांच्याशी अरेरावी च्या भाषेत बोलले जाते त्या मुळे गावकऱ्यांन कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे
डॉक्ट
र,कंपाउंड
र,संबंधित
कर्मचारी उपलब्ध नाहीत का ?,याबाबतची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करून आमोदा येथे कायम स्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी दवाखान्यात द्यावा अशी मागणी आमोदा ग्रामस्थांन कडून केली जात आहे.