हिंगोणा येथील शहीद स्मारक युवकांसाठी ठरतेय प्रेरणादायी
हिंगोणा,ता. यावल,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। २६ /११/२००८ या दिवशी मुंबई येथे अतिरेकी हल्ला झाला होता या हल्ल्यात मूळ हिंगोणा येथील रहीवाशी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी हे सी .एस .टी रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते त्यांच्या आठवणी निमित्त हिंगोणा येथे त्यांच्या मूळ गावी ग्रामपंचायत परिसरात शहीद स्मारक उभारण्यात आले आहे.
या अतिरेकी हल्ल्यास आज १४ वर्षे पूर्ण होत आहे परंतु आज देखील शहिदांचे बलिदान व स्मारक हे मनापासून आठवण करून देत आहे .हिंगोणा येथे शहीद स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती त्यावेळेस तत्कालीन आमदार स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहीद स्मारक उभारण्यात आले आहे हे शहीद स्मारक हिंगोणा येथील तरुण युवक युवतींना प्रेरणा देणारे ठरत आहे .