बेपत्ता बापानेच केला स्वतःच्या चिमुकलीचा विहिरीत ढकलून खून, न्हावी येथील धक्कादायक घटना
फैजपूर, ता. यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील गेल्या १७ तारखेपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकी पैकी पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह एका विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती, मुलगी विहिरीत तर बाप कुठेय? बाप बेपत्ता होता, त्या मुळे संभ्रम निर्माण झाला होता अखेर भयंकर घटना उघळकीस आली, बापानेच पोटच्या चिमुकलीला विहिरीत ढकलून देत खून केल्याचा प्रकार उघळकीस आला.
मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील न्हावी येथील ठुश्या भावला बारेला (वय-३०) रा. गुलझीरी ता.झिरण्या जिल्हा खरगोन (मध्य प्रदेश) सध्या रा.न्हावी, येथे कुटुंबासह राहत असता त्याची पाच वर्षांची लहान मुलगी नेहमी आजारी रहात असल्याने घरच्यांनी तिला १७ आगस्ट रोजी दवाखान्यात नेण्यास सांगितले असता ठुशा बरेला हा मुलीला सकाळी १० वाजता दवाखान्यात नेतो असे सांगून सोबत घेऊन गेला , त्या नंतर दोन दिवसानी अनिताचा मृतदेह न्हावी शिवारातील धीरज चौधरी यांचे शेतातील विहिरीत आढळून आला,
पोलिसांनी या बाबत चौकशी केली असता मयत अनिता या चिमुकलीचे वडील ठुश्या भावला बारेला यानेच तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले.मयत अनिता ची आजी छंडा वारला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ठूश्या भावला बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे. याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास फैजपूर पोलिसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहेत.