तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,नंतर जबरदस्ती केला गर्भपात
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यात एका नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणी सोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची संतापजनक घटना घडली.
संदर्भात २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पंढरीनाथ पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला. या प्रकरणी दि.८ ऑक्टोंबर रोजी बलात्कार, अँट्रासीटीसह विविध कलमान्वये यावल पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.