आमोदा येथील हनुमान मंदिरात चोरी, परिसरात चोऱ्यांमध्ये वाढ
आमोदा,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। यावल तालुक्यातील आमोदा येथे चोरट्यांनी रात्री विरोदा रोड येथील हनुमान नगर मधील हनुमान मंदिर फोडून मंदिरातील पितळी घंटे,समई,व इतर भांडी असा हजारोंचा ऐवज चोरून नेला.ही घटना (दि २ ऑगस्ट) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस आमोदा परिसरात चोरीच्या घटना वाढत आहे.
फैजपूर येथून जवळच असलेल्या आमोदा येथील हनुमान नगर परिसरातील विरोदा रोड येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून या मंदिरातील पितळी घंटे, मोठ्या समई, काही भांडी असे साहित्य चोरून नेले.सकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याच महिन्यात ही चोरट्यांनी या परिसरातुन कापणीला आलेले केळी घड लांबविले होते. परिसरात दिवसेंदिवस कृषी साहित्य, केबल, मंदिरातील चोऱ्या वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे.